बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावळ्या रंगाच्या त्रासाला कंटाळून तरूणाने उचललं हे धक्कादायक पाऊल

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील नोएडा येथे 17 वर्षीय तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपल्या सावळ्या रंगामुळे लोक चिडवत असल्याने त्याने हे पाऊल उचलले असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.

संबंधित तरुणाचे नाव संयम असून तो 11 वी मध्ये शिकत होता. संयमला त्याच्या सावळ्या रंगावरून काही लोक बोलत होते आणि त्यामुळेच तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. अशी माहिती तपास अधिकारी सुधीर कुमार सिंह यांनी दिली आहे. संयमचे वडील सेक्टर 142 मध्ये एका मोबाईल कंपनीत काम करत असून ते त्यांच्या कुटुंबासमवेत महागुण मॉडर्न सोसायटीत राहतात.

सावळ्या रंगाच्या त्रासाला कंटाळून संयमाने 15 व्या मजल्यावरुन उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना त्याचा मृतदेह बिल्डींगखाली आढळून आला आणि त्यांनी ही माहिती लगेच पोलिसांना कळवली. संयमने उचललेल्या पाऊलाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संयमने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. परंतु, त्या वेळी त्याची समजूत काढून त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यात  कुटुंबीयांना यश आले होते. पण आपल्या सावळ्या रंगावरून सारखीच आपली खेचणाऱ्या लोकांमुळे तो प्रचंड निराश झाला आणि त्याने हे धक्कादायक पाऊल उचललं असल्याचं स्पष्ट होत आहे.

थोडक्यात बातम्या

महिलांनी कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही- राज ठाकरे

नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

सासू सासऱ्यांनी केलं सूनेचं कन्यादान; बुलडाण्यातील स्तुत्य घटना

अमृता फडणवीसांनी शेअर केला आणखी एक व्हिडिओ; पाहा व्हिडिओ

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?; अजित पवार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More