बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साऊथ इंडियन अभिनेत्रीचा भीषण अपघात, मित्राचा जागेवर मृत्यू, ‘ही’ होती गाडी

नवी दिल्ली | तामिळ बिग बॉसमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री यशिका आनंद हीच्या कारचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात तिचा मित्र ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे.

यशिकाने आपल्या प्रवासाची सुरुवात इन्स्टाग्रामवरुन केली होती. इन्स्टाग्राम माॅडेल असणारी यशिकाने नंतर अनेक चित्रपटांमधून प्रसिद्धी मिळवली आहे. तसेच ‘बिग बाॅग तामिळ 2’ ची देखील ती स्पर्धक आहे. यशिका आपल्या मित्रांसह महाबलीपूरम वरुन चेन्नईला परतत असताना हा अपघात झाला आहे.

चेन्नईच्या सिमेवरील भागात हा अपघात झाला असून गाडीतील चारही जण दारु पिऊन होते. नशेत वेगाने गाडी चालवत असताना संतुलन बिघडलं आणि गाडी दुभाजकावर आढळली. यामध्ये यशिकाची मैत्रिण भवानी ठार झाली आहे. यशिकासह इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांच्यावर उपचार देखील सुरु आहेत.

दरम्यान, दारु पिऊन नशेत गाडी चालवत असल्याने पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तसेच याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“माझ्याच राज्यात राहून मोठं झालेल्या बॉलिवूडकरांनी जरा संवेदनशील व्हावं”

भारताला मोठा धक्का, सानिया-अंकिताची जोडी पहिल्याच फेरीत बाहेर

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाही’; अजित पवार भडकले

कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही तर…- भरत जाधव

भूस्खलनामुळे 15 फूट रस्ता खचला; कोल्हापुरातील धक्कादायक व्हिडीओ समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More