बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं- रामदास आठवले

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या खळबजनक वक्तव्यामुळे सध्या राज्यातलं राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. या वक्तव्यामुळे राणेंवर पुणे, नाशिक, औरंगाबाद, महाडमध्ये सध्या गुन्हे दाखल झाले आहेत. यातच आता राणेंविरुद्ध शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावर आता रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देत नारायण राणेंना पाठिंबा दर्शवला आहे.

नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याची पाठराखण करताना रामदास आठवले यांनी म्हटलं की, महाराष्ट्राच्या विकासासाठी नारायण राणेंनी हे वक्तव्य केलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, राज्याच्या प्रश्नांकडे जेवढं लक्ष दिलं गेलं पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नसल्यानं राणेंनी हे वक्तव्य केलं आहे.

राज्याचा विकास होणं गरजेचं असून, जनतेला मदत करणं आवश्यक आहे. राणेंची मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याची भावना नसून मुख्यमंत्र्यांनी अधिक सजग व्हावं आणि राज्याचा विकास व्हावा हीच भावना होती, असंही आठवलेंनी म्हटलंय.

नारायण राणे नारळासारखे आहेत. वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे. त्यांच्या एका वक्तव्यावरुन थेट अटक? त्यांना अटक केल्यास राज्यात काय पडसाद उमटतील, याचा विचार सरकारने केलाय का? राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नांदावी ही जबाबदारी लक्षात घेऊन राज्य सरकार निर्णय घेईल, अशी आशा करतो, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“तो फक्त मुख्यमंत्र्यांचा नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचाही अपमान”

नारायण राणेंचे बाण ठाकरेंच्या वर्मी लागलेले दिसत आहेत- अतुल भातखळकर

नारायण राणे नारळासारखे, वरून कठोर आणि आतून मऊ मनाचे- चंद्रकांत पाटील

दिल्लीत आमचं सरकार आहे लक्षात ठेवा, बघतो हे किती उड्या मारतात- नारायण राणे

“खऱ्या आईचं दुध पिलं असेल तर समोर या, तुमची औकात दाखवून देऊ”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More