हृदयविकारापासून वाचायला ‘हा’ पदार्थ करेल मदत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | हृदय (Heart) हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. हृदयविकाराचं प्रमाण हल्ली प्रचंड वाढलं आहे. वाढत्या आणि धावत्या जीवनशैलीमुळं हे प्रमाण वाढलं आहे. हृदयविकार झाल्यास अगदी लहान सहान गोष्टींची काळजी घेतली जाते. त्यामुळे तो होऊ नये यासाठीच प्रयत्न करणं गरजेचं आहे.

अभ्यासानुसार, जर एखाद्याला वारंवार हृदयविकाराचा त्रास होत असल्यास मासे खाल्ल्यानं त्रास कमी होतो. माशांमध्ये असलेलं ओमेगा- 3 फॅटी एॅसिड (Omega-3 fatty acids) हृदयातील कोणत्याही प्रकारच्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी मदत करतं. ओमेगा- 3 फॅटी एॅसिड हृदयातील जळजळ रोखतं.

यामुळेच हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या रुग्णांना मासे खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये सॅल्मन(Salmon), टूना(Tuna), सरडी (Sardy) आणि काॅड फिश आवर्जून खाण्यास सांगितलं जातं. कॅनडातील (Canada) मॅकमास्टर युनिव्हर्सिटीतील हॅमिल्टनच्या संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. अभ्यास करत असताना हृदयविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तीच्या माशांच्या सेवनाबद्दल माहिती गोळा करण्यात आली आहे.

त्यांच्या अभ्यासात आढळून आलं आहे की, या लोकांनी आठवड्यातून किमान 175 ग्रॅम मासे खाल्ल्यानं या आजारांमुळं मृत्यूचा धोका लक्षणीयरित्या कमी झाला. यामुळेच आठवड्यातून हृदयविकारांच्या रुग्णांना आठवड्यातून दोन वेळा मासे खाण्याचा सल्ला दिला जातो.

महत्त्वाच्या बातम्या