बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोगलांना, इंग्रजांना जे जमलं नाही, ते या ठाकरे सरकारने करुन दाखवलं- देवेंद्र फडणवीस

मुंबई | विधिमंडाळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी झालेल्या धक्काबुक्कीमुळे भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यावरून भाजपच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सभागृहात विरोधी पक्षनेते सत्तधाऱ्यांवर आरोपांचा वर्षाव करत आहेत.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा देखील निर्बंध लागू करत, पायी वारीला परवानगी नाकारली. राज्य सरकारच्या आदेशाला न जुमानता पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या बंडातात्या कराडकर यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. यावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला चांगलच धारेवर धरलं आहे.

मोगलांना, इंग्रजांना जे जमलं नाही, ते या ठाकरे सरकारने करुन दाखवलं, असं म्हणत फडणवीसांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक! विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय. श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच. बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?, असा सवालही त्यांनी सरकारला केला आहे.

तसेच बंडातात्या कराडकर यांना अटक करण्यापलिकडे दुसरा काहीच मध्यम मार्ग नव्हता? वारकर्‍यांचा असा अपमान? थेट अटकेची कारवाई ही प्रथा चुकीची असल्याचं म्हणत या सरकारचा तीव्र निषेध त्यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहामध्ये अनेक मुद्यावरून सरकारला फटकारलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘वासरू मारलं म्हणून कुणी गाय मारत असेल, तर…’; फडणवीसांचा सूचक इशारा

“…पण हे मुंबई मॉडेल नाही, तर मृत्यूचं मॉडेल”

“12 आमदारांचं निलंबन हा लोकशाहीचा खून”

अधिवेशनादरम्यान आजही सभागृहात राडा; आमदार रवी राणांनी विधानसभेतील ‘राजदंड’ पळवला

हेलिकॉप्टरमधून नवरदेवासोबत खासदार अमोल कोल्हेंनी केली दमदार एन्ट्री!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More