काय सांगता??? फक्त 7 ते 8 रुपयात 100 किमी धावणार, ‘ही’ गाडी धमाल करणार!
मुंबई | हैदराबाद येथील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेडने इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनीकडून डिझाईन तयार करण्यात आली आहे. या नविन Atum 1.0 ची मुळ किंमत 50,000 रूपये आहे.
Atum 1.0 ची युएसपी डिझाईन आहे. ही इलेक्ट्रिक कार अनेक वैशिष्ट्यांसह येते. या बाईकचे सीट आरामदायी मानलं जातं. तसेच दिर्घकाळ चालणारी बॅटरी आणि एकवेळेस चार्जिंग केल्यावर 100 किमी रेंज आणि डिजिटल डिस्लेसह एलईडी हेडलाइट, इंडिकेटर आणि लाईट यामध्ये समाविष्ट आहेत.
Atum 1.0 ही 6 किलो वजनाच्या पोर्टेबर बॅटरीसोबत येते. ही बाइक चार तासांमध्ये चार्ज होते. Atum 1.0 ही एकदा चार्जिंग केल्यानंतर 100 किमी अंतर कापू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. ही बाईक ऑपरेट करण्यासाठी कमी खर्च येतो. तसेच सामान्यत: Atum 1.0 ला 100 किमी अंतर कापण्यासाठी फक्त 7 ते 8 रूपये लागतात. तर पारंपारिक ICE बाईकमध्ये 100 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 80 ते 100 रुपये मोजावे लागतात.
दरम्यान, ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटडचे संस्थापक वामसी गद्दाम यांनी म्हटलं आहे की, तीन वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर Atum 1.0 लाँच करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भारतीय ग्राहकांच्या आकांक्षा, उद्देश आणि सोई लक्षात घेवून बाइकची रचना करण्यात आली आहे. आम्हाला विश्वास आहे की, अगदी कमी वेळेमध्ये बाजारपेठ काबीज करेल, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
थोडक्यात बातम्या-
प्रीति झिंटाने शाहरुख खानला विकत घेतलं, आर्यन-सुहाना बघतच राहिले
“अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेमधून बाहेर जावं लागेल”
“यमदेव घेऊन जातो तेव्हा त्याच्या जवळही रेडा असतो, म्हणूनच…”
“शिवसेनेेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो… भाजपने पाठीत खंजीर खुपसला”
“महाविकास आघाडीतील छोट्या पक्षांना कवडीचीही किंमत देत नाहीत, शरद पवारांनी…”
Comments are closed.