नवी दिल्ली | मधुमेह (Diabetes) ही हल्लीची साधारण समस्या झाली आहे. भारत हा मधुमेहाच्या सर्वाधिक रुग्णसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकांचा देश ठरला आहे. भारतात सध्या 77 दशलक्ष मधुमेहाचे रुग्ण सक्रिय आहेत. मधुमेहावर उपचारांसाठी वारंवर नवनवे संशोधन होत असतात. आयुर्वेदाला आपल्या उपचार पद्धतीत खूप महत्व आहे. असाच एक आयुर्वेदिक उपचार आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
गु़डमार आयुर्वेदात महत्वाचा समजला जाणार घटक आहे. याचा उपयोग मधुमेहींसाठी केला जातो. सापाचा दंश झाल्यावर सुद्धा याचा उपयोग केला जातो. गुडमारमध्ये फ्लेव्होनाॅल (Flavonol) आणि ग्वारमारिनसारखे गुणधर्म आहेत. मधुमेहामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये गु़डमारमुळे साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.
गुडमार ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. जी अॅलर्जी, खोकला आणि बद्धकोष्ठता (Constipation) यासारख्या अनेक समस्यांच्या उपचारामध्ये वापरली जाते. या वनस्पतीचे वैशिष्ट म्हणजे ही खाल्यानंतर एक तासासाठी तुम्हाला कोणाताही गोड पदार्थ गोड लागत नाही. गुडमार खाल्ल्यानंतर साखरेचे किंवा गुळाचे सेवन केले तर त्यांची गोड चव जाणवणार नाही.
नेहमी सकाळी जेवण करण्यापूर्वी सुमारे एक तास आधी एक चमचा गुडमार पानांच्या चूर्णाचे सेवन करावे. यामुळे मधुमेहीव्यक्तीला सगळे गोड पदार्थ खाण्याची लालसा कमी होते. त्यामु्ळे त्याच्या जिभेवरील गोडाच्या टेस्टबडवरील साखरेचे रिसेप्टर्स ब्लाॅक होतात. त्यामुळे अश्या लोकांना गोड खाण्याची इच्छा कमी होते. मधुमेही व्यक्तीकडून गोडाचं सेवन कमी केल जात. त्यामुळे मधुमेहींनी आर्युवेदिक (Ayurvedic) डाॅक्टराच्यां सल्ल्याने गुडमार वनस्पती, अथवा चुर्णाचं सेवन करू शकतात.
थोडक्यात बातम्या
संधी सोडू नका! iPhone 13 वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट
शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून मिळणार मोठं गिफ्ट
प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल!
‘बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच’; संजय राऊत आक्रमक
Comments are closed.