मुंबई | महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून प्रसिद्धी झोतात आलेल्या ओंकार भोजनेची (Onkar Bhojane) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. छोट्या पडद्यावरील त्याची विनोदबुद्धी, त्याचं टायमिंग यामुळे त्यानं खूप कमी वेळात प्रसिद्धी मिळवली. कोकणाचा हा कोहिनूर हिरा सगळ्यांना आवडू लागला.
महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमानंतर ओंकारनं ”फू बाई फू’ या कार्यक्रमामधून देखील लोकांना हसवण्याचं काम केलं. सध्या ओंकारचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ओंकार कविता म्हणताना दिसत आहे. या कवितेचं सगळीकडून कौतुक होत आहे.
तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची. गड्या तयारी ठेव रे मानाची कधी हुकायची, कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हाय रं…तुला उचलून घेणार हाय रं… असे गाण्याचे बोल आहेत. या गाण्यावेळी प्रेक्षकांच्या प्रचंड अशा टाळया ऐकू येत आहेत.
एका कार्यक्रमादरम्यान ओंकारनं ही कविता सादर केली होती. ओंकारचा हा व्हिडीओ अपक्ष आमदार सत्यजीत तांबे (MLA Satyajit Tambe) यांना देखील आवडला. त्यांनी ओंकारचा हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ”तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची… कमाल गायलंस मित्रा, ओंकार भोजने, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या