नवी दिल्ली | 31 मार्च रोजी चालू आर्थिक वर्ष संपणार असून 1 एप्रिल 2022 पासून नवीन आर्थिक वर्षाला सुरूवात होत आहे. 2022-23 या नवीन आर्थिक वर्षात पैशाशी संबंधित अनेक बदल होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे.
1 एप्रिलपासून अनेक महत्त्वाच्या वस्तूंच्या किमतीत वाढ होणार आहे. औषधाच्या किमती ठरवणाऱ्या प्राधिकरणाने औषधांच्या किमती 10.7 टक्क्यांनी वाढवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे सर्वात आधी काही महत्त्वाच्या औषधांच्या किमती वाढणार आहेत. महाग होणाऱ्या औषधांमध्ये तब्बल 800 औषधांचा समावेश आहे.
औषधांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील महागणार आहेत. हेडफोन, इअरफोन, लाउडस्पिकर, इलेक्ट्रॉनिक खेळण्या, एक्स-रे मशिन, सोलर सेलच्या किमतीत वाढ होणार आहे. तर इमिटेशन ज्वेलरी, छत्री यासारख्या वस्तू देखील महागणार आहेत.
दरम्यान, हिरे, हिऱ्याचे दागिने, विदेशी मशिन स्वस्त होणार आहेत. तसेच कपडे, चामड्याचे सामान, मोबाईल फोन, चार्जर, शेती अवजारे यासारख्या वस्तूमच्या किमती 1 एप्रिलपासून कमी होत असल्याने नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे.
थोडक्यात बातम्या-
महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ, 25 पेक्षा जास्त आमदारांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल
1 एप्रिलपासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटवणार पण…; राजेश टोपेंनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती
“संजय राऊत, शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा आवाज कोणी बंद करू शकणार नाही”
‘रशियन सैनिकांनी माझ्या पतीला गोळी मारली आणि मग माझ्यासोबत…’, युक्रेनियन महिलेच्या दाव्यानं खळबळ
“… त्यामुळे भाजपला माझी भीती वाटणं स्वाभाविक आहे”
Comments are closed.