बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना व्हायरसच्या लढाईत आता ‘ही’ लस ठरणार गेमचेंजर

मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगामुळे आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नागरिकांना सामोरं जावं लागत आहे. अशातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटमुळे नागरिकांची चिंता वाढवली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असलेला पहायला मिळत आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांना लसीकरण करण्यास आवाहन केलं जात आहे. अशातच आता व्हायरसविरूद्धच्या लढाईत आणखी एक लस सहभागी झाली आहे. ही लस कोरोना लढ्यात प्रभावी आणि गेमचेंजर ठरु शकते.

भारत बायोटेकची नेझल वॅक्सिन कोरोना व्हायरसविरूद्धच्या लढाईत गेमचेंजर ठरू शकते. या लसीला बुस्टर डोसच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीसाठी मान्यता मिळाली आहे.  त्यामुळे आात ही लस कितपत प्रभावी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, जर ही लस क्लिनिकल चाचण्यांमध्ये म्यूकोसल इम्युनिटी देते, तर ते एक मोठे यश असेल. अशा स्थितीत ही लस महामारीविरुद्धच्या लढाईत गेम चेंजर ठरू शकते, असं दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे डॉ. संजय राय यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

तुमचं वजन वाढतयं का?, वजन कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा

घशात दुखत असेल तर करा ‘हे’ नैसर्गिक उपाय, मिळेल त्वरित आराम

अभिमानास्पद! इस्राएलमधील रस्त्याला देणार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव

धक्कादायक! रात्री उशीरापर्यंत मोबाईल वापरल्यावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी मोठी अपडेट, डाॅक्टर म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More