बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबासाहेब पुरंदरे अनंतात विलीन मात्र ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण

पुणे |  बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे 5 वाजून 7 मिनिटांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. ते मागील आठवड्यापासून रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र उपाचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचं वय 100 वर्षे होतं. पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

पुरंदरेंच्या मृत्यूने सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुरंदरेनी आपलं संपूर्ण जीवनभर लोकांपर्यंत इतिहास पोहोचवण्याचं काम केलं आहे. मात्र, त्यांची एक इच्छा  अपूर्णच राहिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पुरंदरे यांनी किल्ल्यांच्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त केली होती. या किल्ल्यांचे संवर्धन करण्याची गरज असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

ते म्हणाले होते,”काहीतरी नविन करण्याची हौस पाहिजे. शिवाजी महाराजांना ती हौस होती म्हणून त्यांनी गडकिल्ले बांधले. ती हौस लोकांमध्ये जागी करण्याचे काम आपल्या अभ्यासकांनी करायला पाहिजे.” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी जनमताचा रेटा असायला हवा. असंही त्यांनी बोलून दाखवलं होतं.

याशिवाय ते म्हणाले होते,”महाराष्ट्रात 352 किल्ले आहेत. समुद्र किनाऱ्यावर 65 किल्ले आहेत. अनेक लोक माझ्याकडे येतात. आमक्या किल्ल्यावर हे करायचं आहे, तसं करायचं आहे.  मात्र, अनेक असे किल्ले आहेत ज्या किल्ल्यांवर काहीच राहिलेलं नाही. शिवाय आपलं महाराजांविषयीचे प्रेम वरवरचं आहे” अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती.

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेबांची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन आस्मानचा फरक”

“नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तिला…”, ‘या’ मंत्र्याची कंगनाविरोधात रोखठोक भूमिका

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने गडकरी हळहळले, म्हणाले…

…तर इतर सर्व महामंडळातील कर्मचारीही विलीनीकरणाची मागणी करतील

लोणावळ्याच्या तन्वी बंगल्यात पोलीस पोहोचले अन् समोर जे दिसलं ते पाहून हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More