बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही’ महिला ठरली भारतातील सर्वात श्रीमंत महिला!

नवी दिल्ली | फोर्ब्सने नुकतीच त्यांची रिच लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये गेल्या 14 वर्षांप्रमाणे या वर्षी देखील रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी प्रथम स्थान पटकावलं आहे. तर यामध्ये भारतातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून सावित्री जिंदल यांनी सातव्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे.

सावित्री जिंदल या 71 वर्षाच्या असून भारतातील श्रीमंतांच्या यादीत सातव्या स्थानी आहेत.’फाेर्ब्स’च्या माहितीनुसार त्यांच्याकडे 13.46 लाख काेटी रुपयांची मालमत्ता आहे.

गेल्या वर्षभरात सावित्री जिंदल यांच्या संपत्तीत सुमारे 9.72 लाख काेटी रुपयांची वाढ झाली आहे. जाहीर केलेल्या यादीत सावित्री जिंदल या महिलांच्या यादीत प्रथम क्रमांकवर आहेत.

दरम्यान, जाहीर केलेल्या टाॅप 100 यादीत सहा महिलांना स्थान मिळालं आहे. यामध्ये हॅवेल्स इंडियाच्या विनोद राय गुप्ता, युएसव्ही प्रायव्हेट लि. च्या लीना तिवारी, बायजूच्या दिव्या गोकुलनाथ, बायोकाॅनच्या किरण मजूमदार शाॅ आणि टाफेच्या मल्लिका श्रीनिवासन यांचा समावेश आहे.

 थोडक्यात बातम्या-

पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी करणं सरकारच्याच हातात- शक्तिकांत दास

लसीचा एकही डोस न घेतलेल्या कर्माचाऱ्यांना झटका; सरकारने घेतला मोठा निर्णय

“मी सांगितलं होतं निवडून येऊ देणार नाही, मग पाडलं काय म्हणता”

आजपासून पुणे अनलाॅक; कोरोना नियमांमध्ये होणार शिथिलता

एअर इंडियाला रूळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल- रतन टाटा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More