बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हर एक फ्रेंन्ड कमीना होता है! लग्नात मित्रांनी असं गिफ्ट दिलं की; ते पाहून तुम्हीही व्हाल चकीत, पाहा व्हिडीओ

मुंबई | जेव्हापासून कोरोनाने सगळीकडे थैमान घालायला सुरूवात केली आहे. तेव्हापासून अनेकांचे लग्नाचे बार उडाले आहेत. आजकाल यासंदर्भातील व्हिडीओ तसेच मजेशीर फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, प्रत्येकाच्या आयुष्यात काही जिगरी मित्र असतात. यांच्याशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. असे मित्र आपल्याला खूप जीव लावतात. तसेच ते जेवढा जीव लावतात तेवढीच आपली हटाईही करत असतात. अनेकदा व्हिडीओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की, मित्र आपल्या मित्रांसोबत वेगवेगळे प्रॅंक करत असतात. अशातच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका मित्राच्या लग्नात मित्रांनी भेटवस्तू म्हणून अनेक संसारिक गोष्टी दिल्या आहेत.

व्हिडीओमध्ये एक लग्न सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याठिकाणी नवरीचे आणि नवरदेवाचे मित्र त्यांना एकामागून एक गिफ्ट देत आहेत. सुरूवातीला सगळे मित्र रांगेतून येत असून, त्या प्रत्येकाच्या हातात काही ना काही आहेच. कोणाच्या हातात लहान मुलाला चालण्यासाठी वापरण्यात येणारं वॉकर आहे. तर कोणाच्या हातात बॅट आहे. त्यानंतर एक-एक करत ते स्टेजवर जाऊन त्या दोघांना गिफ्ट देत आहेत. हे सगळं पाहून त्या नवदाम्पत्याला खूप आनंद होत आहे. मात्र त्या मित्रांनी दिलेले गिफ्ट पाहून त्यांना हसूही येत आहे.

एकाने तर हद्दच केली. चक्क त्या दोघांना दात घासायचे टूथब्रश दिले आणि नवरदेवाच्या गळ्यात शॅंपूची भली मोठी माळ गळ्यात टाकली. हे तर काहीच नाही एका मुलीने तर त्या दोघांना आंघोळीसाठी काळ्या रंगाची एक बादली दिली असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

“महागाईचं भांडवल करून सत्तेत आलेल्यांना सामान्य जनतेचा कळवळा उरला नाही”

5 रूपयांचा एक समोसा मग 4 कितीचे?; लहान मुलाच्या निरागस युक्तीवादाचा व्हिडीओ व्हायरल

मुलगी झाली म्हणून विवाहितेसोबत तिच्याच कुटुंबियांनी केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

‘मोहम्मद सिराज हा जसप्रीत बुमराहला सर्वोत्तम पर्याय’; भारतीय संघाच्या ‘या’ माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

एका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More