Top News महाराष्ट्र मुंबई

यंदा दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘या’ महिन्यात;वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई | राज्य शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षांना यावर्षी लेटमार्क लागणार आहे. या परीक्षा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये घेण्यासंदर्भात विचार सुरु असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका खासगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात शुक्रवारी वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली.

त्यावेळी त्यांना दहावी-बारावी परीक्षा संदर्भात विचारणा केली असता त्या म्हणाल्या की, “दरवर्षी दहावी- बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात. परंतु कोरोनामुळे बंद असलेल्या राज्यातील शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. अनेक ठिकाणी अद्याप शाळा सुरु करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे यासंदर्भात शिक्षण तज्ञांचे मार्गदर्शन घेत आहोत. तसेच राज्य शिक्षण मंडळाशी देखील याबाबत चर्चा सुरु आहे”.

दरम्यान, दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यासंदर्भातील एक प्रस्ताव राज्य शिक्षण मंडळापुढे ठेवला होता. परंतु दहावी-बारावीचे विषय जास्त असल्यामुळे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यास बऱ्याच अडचणी असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

वकिलांची फी, नुकसान भरपाई सत्ताधारांच्या खिशातून द्या; भाजपची मागणी

‘ती’ व्यक्ती मला माहीत होती; लता मंगेशकर यांचा अत्यंत धक्कादायक आरोप

चंद्रकांत पाटलांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर…- हसन मुश्रीफ

“मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरं मूल जन्माला घातलं नाही”

100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या