बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारने केली यंदाच्या गणेशोत्सवासाठीची नियमावली जाहीर, वाचा सविस्तर!

मुंबई | गेल्या वर्षभरापासून कोरोना रोगाने सगळीकडे थैमान घातलं आहे.  सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू असून, तिही आता हळू-हळू आटोक्यात येत आहे. परंतू कोरोनाचा अजूनही धोका टळला नसल्यानं राज्य सरकारनं पूर्वीचे निर्बंध कायम ठेवले आहेत.

याच पार्श्वभूमीवर मागिल वर्षीप्रमाणे याहीवर्षी  सरकारने येणारा गणेश उत्सवही साधेपणाने साजर करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केले आहे. तसेच त्या संदर्भातील नियमावलीही सरकारने जारी केली आहे. त्यामध्ये गणेश मंडळांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत.

नियमावली-

  •  गणेशोत्सवाबाबत परवानगी घेणे अपेक्षित. मंडप परिसरात आरती, भजन, किर्तन या दरम्यान होणारी गर्दी टाळावी. कोरोना संसर्ग पाहून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. नागरिक देतील ती वर्गणी स्विकारावी, सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत.
  •  गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी.
  •  श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळासाठी 4 फूट आणि घरगुती गणपतीसाठी 2 फुटांच्या मर्यादेत असावी.
  • यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू किंवा संगमरवर अशा मूर्तीचं पूजन करावं. मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावं. विसर्जन घरी करणं शक्य नसल्यास जवळच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करावं.
  • गणेशोत्सवात जाहिरातींमुळे नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याचबरोबर इतर जाहिरातींपेक्षा आरोग्यविषयक जाहिरातींना प्राधान्य देण्यात यावं.
  •  विविध सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिरासारखे आरोग्यपूरक उपक्रम राबवण्यावर भर दिलं जावं. तसेच यामाध्यामतून डेंग्यू, मलेरिया, कोरोना सारख्या आजारांची नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात यावी.
  •  राज्य सरकारकडून वेळोवेळी लागू करण्यात आलेले सर्व नियम कायम राहतील याची काळजी घ्यावी. गणेशोत्सवा दरम्यान यामध्ये कोणतीही मोकळीक दिली जाणार नाही.
  •  श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.
  •  श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनास्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित रित्या काढण्यात येऊ नये.

थोडक्यात बातम्या-

“पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये क्लीन बोल्ड होणार”

‘कोविशिल्ड’ लस घेतलेल्या भारतीयांना ‘या’ देशात जाण्यास अडचणी, पुनावाला म्हणाले….

गरोदरपणातील कपड्यांची अनुष्का शर्मा करणार विक्री

एकेकाळी सर्वाधिक कोरोना मृत्युदर असणारा ‘हा’ देश बनला युरोपातला पहिला मास्क फ्री देश

“…तर मी बुलडोझर पुढे आडवा पडलो असतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More