बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

यंदाचा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार ‘या’ 3 संशोधकांना जाहीर!

स्टॉकहोम | भौतिक शास्त्रातील नोबेल 2021 पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा भौतिक शास्त्रातील पुरस्कार तीन संशोधकांना देण्यात आला आहे. जपानी वंशाचे अमेरिकन स्युकुरो मनाबे, जर्मन क्लाऊस हॅसलमन आणि इटालियन जॉर्जियो पॅरीसी यांना देण्यात आला. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे पृथ्वीच्या बदलत्या हवामानसारख्या जटिल भौतिक प्रणाली सोप्या भाषेत समजावून सांगता येऊ शकणार आहे.

स्युकुरो मनाबे आणि क्लाऊस हॅसलमॅन यांनी पृथ्वीच्या हवामानाबद्दल आणि मानवतेवर त्याचा कसा प्रभाव पडतो याबद्दल त्यांनी संशोधन केलं आहे. जॉर्जियो पॅरीसीला यांनी आण्विक ते गृहपातळीवरील चढउतारांचा अंतर्गत पातळीवर होणाऱ्या बदलांचा अभ्यास केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे, असं स्वीडिश अॅकडमी ऑफ सायन्सने एका निवेदनात म्हटलं आहे.

अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात काम करणाऱ्या मनाबे यांनी 1960 च्या दशकात पृथ्वीच्या हवामानासंबंधी समजून घेता येईल याचा अभ्यास केला होता. हॅसलमन यांनी सुमारे 10 वर्षानंतर असे मॉडेल विकसित केलं आहे की, जे मानवजातीच्या कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनामुळे वातावरणातील वाढत्या तापमानास कारणीभूत ठरतात हे सिद्ध करण्यात यश आलं आहे.

दरम्यान, भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार लहान कणांपासून ते अंतराळातील संशोधनात महत्वाचे योगदान देणाऱ्या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार देण्यात येतो. मागील वर्षी रॉजर पेनरोज,रेनहार्ड गेंजेल आणि अॅण्ड्रीया गेज यांना जाहीर करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून सपना चौधरीने आपल्या लेकाला दिलंय राजाचं नाव, पाहा व्हिडीओ!

‘देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का?’; लखीमपूर घटनेवरून संजय राऊतांचा मोदी सरकारला सवाल!

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर, आजही दरात घसरण

‘माझ्या वडिलांना…’; एनसीबीकडे शाहरूख खानबाबत आर्यनने केलं मोठं वक्तव्य!

तालिबान्यांच्या ‘या’ नव्या फतव्यामुळे अफगाणिस्तानमधील तरूण मोठ्या संकटात!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More