बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नागपूर नाही मुंबईच!, “मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन मुंबईतच होणार”

मुंबई | दरवर्षी प्रथेप्रमाणे राज्याचं हिवाळी अधिवेशन (Winter session) नागपूरला घेतले जाते. मात्र, यंदा हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असल्याची माहिती आहे. तसेच नागपूर येथे मार्च महिन्यात विशेष बाब म्हणून अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना माहिती दिली आहे. (Minister Anil Parab was informed about the winter session)

राज्यात येत्या 22 ते 28 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशनाचं कामकाज चालणार आहे. या अधिवेशनात 12 विधेयके मांडणार असल्याची माहिती आहे. तसेच 14 डिसेंबरला बिझनेस अॅडवायझरी कमिटीची मिटिंग होणार आहे फक्त पाच दिवस अधिवेशन होणार असल्यामुळे नाराज असल्याचं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये होणार होतं. मात्र, मुख्यमंत्री स्वतः अधिवेशनात उपस्थित राहणार असल्याने मुंबईत अधिवेशन घेतले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बघता हे अधिवेशन मुंबईत होणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची जबाबदारी घेणाऱ्यांनी कामगारांच्या नुकसानीची पण जबाबदारी घ्यावी. 41 टक्क्यांची पगारवाढ करण्यात आल्यानंतरही संप मागे घेतला जात नाही, असंही अनिल परब म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांची तब्येत बघता हे अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली .तसेच ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटबाबत बैठक झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात प्रवेशासाठी ज्यांचे लसीचे दोन डोस पुर्ण झालेले आवश्यक आहेत. तसेच अधिवेशनात उपस्थित राहण्याकरिता आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

नव्या Omicron व्हेरिएंटची लक्षणं कोणती?; आली ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

“आम्ही सरकार पाडणार नाही, ज्यादिवशी सरकार पडेल त्यादिवशी…”

‘ही’ मराठी अभिनेत्री का म्हणतेय?, हा ट्रॅप आहे यात अडकू नका

“मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि ते परत घरात दिसेनासे झाले”

नोकरी गमावलेल्यांना सरकार देणार भत्ता ‘ही’ आहे भन्नाट योजना

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More