बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अजब चोरीची गजब कहाणी! शेतकऱ्याचा 100 क्विंटल कांदाच चोरट्यांनी केला लंपास

धुळे | देशात महागाई दिवसेंदिवस गगनाला भिडत आहे. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर, सीएनजी, पीएनजीच्या दराने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसागणीक वाढत आहेत. रोजची दरवाढ सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लावणारी आहे. वाढत्या महागाईसोबत चोरीच्या घटना देखील वाढत आहेत. चोरीची एक अजब घटना धुळे जिल्ह्यात घडली आहे.

शेतकऱ्याने साठवून ठेवलेल्या तब्बल 100 क्विंटल कांद्यावरच चोरट्यांनी हात साफ केला आहे. ही घटना धुळे जिल्ह्यातील कसुंबा तालुक्यात घडली आहे. सुभाष शिंदे या शेतकऱ्याकडे ही चोरी झाली आहे. शिंदे यांनी त्यांच्या शेतातील चाळीत 115 क्विंटल कांदा साठवून ठेवला होता. यापैकी 15 क्विंटल कांद्याची भाव मिळेल या आशेने मागील महिन्यातच विक्री केली होती.

पण उरलेल्या 100 क्विंटल कांद्याची रातोरात चोरी झाली आहे. एका रात्रीत 100 क्विंटल कांदा चोरट्यांनी लंपास केल्याने या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. कांद्याचा आजचा किमान भाव हा अंदाजे 1000 रूपये प्रति क्विंटल तर कमाल भाव साधारण 3500 रूपये प्रति क्विंटलच्या जवळपास असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या कांद्याची चोरी झाल्याने शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कांद्याचे भाव सध्या वधारले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पावसापासुन शेतीमाल वाचवत साठवून ठेवला. पण वाढत्या महागाईमुळे चोरट्यांनी त्यांचा मोर्चा आता शेतकऱ्यांनी साठवून ठेेवलेल्या मालाकडे वळवला आहे. कुसुंबा गावातील या कांदा चोरीच्या घटनेनंतर आजुबाजूच्या परिसरात मात्र भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

थोडक्यात बातम्या-

बिग बॉसच्या दोन भागांसाठी मांजरेकरांना मिळतात इतके लाख; मानधन ऐकून व्हाल थक्क

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनं सांगितलं इंधन दरवाढीचं कारण, म्हणाले…

SBI ने शेतकऱ्यांसाठी आणली नवी योजना; होणार ‘हा’ मोठा फायदा, वाचा सविस्तर

राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे उघडण्याचा मुहूर्त अखेर ठरला; ‘ही’ असणार नवी नियमावली

IPL 2021: पराभवानंतर विराट कोहलीला अश्रू अनावर, पाहा भावूक व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More