बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डिजीटल माध्यमासाठीचा पत्रकारिता पुरस्कार ‘थोडक्यात’ला; कृष्णा वर्पेंचा सन्मान

पुणे | लोकमत पत्रकारिता पुरस्काराचा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. दैनिक लोकमतच्या (Lokmat) वतीने पुण्यातील पत्रकारांचा लोकमत पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. दैनिक लोकमतच्या वतीने देण्यात आलेला पहिला डिजीटल माध्यमासाठीचा पुरस्कार ‘थोडक्यात’ न्यूज पोर्टलला मिळाला आहे.

थोडक्यातचे संस्थापक कृष्णा वर्पे (Krishna Varpe) यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृष्णा वर्पे यांनी सुरू केलेलं ‘थोडक्यात’ हे कमीत कमी शब्दात बातम्या देणारं मराठीतील पहिलं न्युज पोर्टल आहे.

कमीत कमी शब्दात बातम्या देणारं व सर्व सोशल मीडिया माध्यमांवर २८ लाखांहूनही अधिक फॉलोवर्स असलेलं थोडक्यात हे पहिलं स्वतंत्र न्युज पोर्टल आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून एका माध्यम समूहाने इतर माध्यम समूहातील पत्रकारांचा गौरव करत त्यांना कौतुकाची थाप दिली आहे.

दरम्यान, पुण्यातील JW Marriot हॉटेलमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि सोबतच इतर पुरस्कर्ते देखील उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या स्टेल्थ व्हेरिएंटचा महाराष्ट्राला किती धोका?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

मिस यूनिवर्स हरनाज संधूचं हिजाब वादावर मोठं वक्तव्य, म्हणाली…

“25 वर्ष मुंबईला लुटणारे कुटुंब म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांना जेल झालीच पाहिजे”

मोठी बातमी! रशियाच्या मागण्यांवर झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात पडळकर तेवढंच काम करतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More