“..महिन्यातच मोदी सरकार कोसळणार”; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

NDA Govt | लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. एनडीए आघाडी आता सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली करत आहे. कालच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एनडीए नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होणार, यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. अशात इंडिया आघाडीच्या एका बड्या नेत्याने खळबळजनक दावा केला आहे.

मोदी सरकार पाच वर्षही टिकणार नाही?

इंडिया आघाडीच्या एका बड्या नेत्याने मोदींच्या सरकारबाबतची मोठी भविष्यवाणी केली आहे. काही महिन्यातच मोदी सरकार पडेल, असा दावा या नेत्याने केला आहे. त्यामुळे देशभर सध्या खळबळ उडाली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला 232 जागा मिळाल्या आहेत. दिल्लीत इंडिया आघाडीकडून देखील मोठ्या हालचाली केल्या जात आहेत. अशातच विडुदलाई चिरुतैगल कच्ची या (NDA Govt) पक्षाचे म्हणजे दलित पँथर ऑफ इंडियाचे नेते थोल थिरुमावलवन यांनी सर्वात मोठा दावा केला आहे.

थोल थिरुमावलवन यांचा मोठा दावा

“भाजप पाच वर्ष स्थिर सरकार राहणार नाही. काही महिन्यात, त्यांना त्यांच्या आघाडीतील समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. हे सरकार जास्त दिवस चालणार नाही. तेव्हा योग्यवेळी आम्ही योग्य पावलं उचलणार आहोत.”, असं थिरुमावलवन यांनी म्हटलंय.

दरम्यान, एनडीए सरकार स्थापन करण्यासाठी (NDA Govt) भाजपला जेडीयू आणि टीडीपी या मित्र पक्षांची गरज भासणार आहे. पण, हे दोन्ही पक्ष एनडीएतून बाहेर पडले तर इंडिआ आघाडीचा सरकार बनवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.इंडिया आघाडीकडून यासाठी प्रयत्न देखील केले जात आहेत. अशात या नेत्याच्या विधानामुळे आता वेगळ्याच चर्चा रंगत आहेत.

News Title – Tholkappiyan Thirumavalavan big claims on NDA Govt

महत्त्वाच्या बातम्या-

‘अजित पवारांनी गुरंढोरं सांभाळावीत’; ‘या’ नेत्याचा अजितदादांना खोचक सल्ला

अजित पवार-एकनाथ शिंदेंवर बूमरँग होणार?; मोठी माहिती समोर

“मी पुन्हा येईन…पुन्हा येईन म्हणणाऱ्यांचे आता बारा वाजलेत”

निकालानंतर अजित पवार गप्पच; आमदारांची धाकधूक वाढली, मोठा निर्णय घेणार?

“एकनाथ शिंदेंवर दबाव होता, तिकीट मिळू नये म्हणून स्क्रिप्ट..”; शिंदे गटाच्या खासदाराचा गौप्यस्फोट