Top News

“गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना आजही धोका आहे”

मुंबई | आजही गांधी कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत. त्यांना आजही धोका आहे. अशा स्थितीत त्यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणं दुर्दैवी आहे, असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे.

प्रियंका गांधी यांनी त्यांच्या आजी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांचा मृत्यू पाहिला आहे. आजही त्यांच्या कुटुंबावरील संकटं संपलेली नाहीत, त्यांना धोका आहे. असं असताना केवळ राजकारण म्हणून त्यांना त्रास देणं योग्य नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत आहे. प्रियंका गांधी सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल प्रश्न विचारत आहेत. त्यांनी प्रश्न विचारु नयेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप थोरातांनी केंद्र सरकारवर केला आहे.

सरकारकडे प्रियंका गांधी उपस्थित करत असलेल्या या प्रश्नांची उत्तरं नाहीत. त्यामुळेच अशा गोष्टी करुन सरकार दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रियंका गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारत राहील, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

राज्यभरातील खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार- राजेश टोपे

टिकटाॅक बंद झाल्यानं 2 बायकांसह धुळेकर उद्ध्वस्त; आतापर्यंत इतक्या लाखांची कमाई!

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज- राजेश टोपे

सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; प्रतितोळा सोनं 50 हजारांच्या पार

चौथीची पोरगी सांगेल, ठाकरे सरकारचं काही खरं नाही- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या