बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘सगळेच दिवस सारखे नसतात दिवस फिरतात, त्यामुळे…’, उद्धव ठाकरे भाजपवर बरसले

मुंबई | संजय राऊतांना(Sanjay Raut) ईडीकडून(ED) रविवारी उशिरा अटक करण्यात आले. त्यावरून आज दिवसभर चर्चांना उधाण आलं आहे. काही ठिकाणी राऊतांना अटक केल्याच्या विरोधात आंदोलने केली जात आहेत. तर काही राजकीय नेत्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरेंनीही(Uddhav Thackray) आज दुपारी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांच्या अटकेवर आणि इतर राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले.

संजय राऊत हे आपले जवळचे मित्र आहेत. मी राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. संजय राऊतांचा मला अभिमान आहे, ते सच्चे शिवसैनिक आहेत, ते झुकले नाहीत, असं राऊतांच्या अटकेवर उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच संजय राऊतांचा गुन्हा काय आहे?,असा सवाल त्यांनी मीडियाशी बोलताना उपस्थित केला. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राजकारण आता घृणास्पद होत आहे. प्रादेशिक आस्मिता चिरडण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. विरोधात बोलणाऱ्यांना अडकवलं जात आहे, असा आरोप उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला.

तसेच भाजपचे(BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा(J.P.Nadda) यांनी पटणा येथे जाहीर सभेत महाराष्ट्रात शिवसेना संपत चालली आहे, असं वक्तव्य केले होते. त्याला आज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे. पक्ष संपवायचा असेल तर जनतेत जाऊन दाखवा, प्रत्येकाचा काळ बदलत असतो. नड्डांचं हे वक्तव्य हूकुमशाहीकडे वाटचाल करणारं आहे, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

एकूणच उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच धारेवर धरले होते. सर्व दिवस सारखे नसतात, दिवस फिरत असतात. त्यामुळे सत्तेत बसलेल्यांनी मोठ्या बाता मारू नये, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

 शिवसेनेबाबत जे.पी. नड्डांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ

संजय राऊतांच्या अटकेवर शरद पवारांनी प्रतिक्रिया देणं टाळलं!

राऊतांच्या घरी सापडलेल्या 10 लाखांच्या पाकिटावर एकनाथ शिंदेंचं नाव, शिंदे म्हणतात…

संजय राऊतांच्या घरातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त

सर्वात मोठी बातमी! संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More