बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…त्या लोकांनी केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करावा- संजय राऊत

मुंबई | गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने थैमान घातलं होतं. त्यावेळी आरोग्य सुविधांचा मोठा तुटवडा जाणवू लागला होता. काही रूग्णांना ऑक्सिजन सिलेंडर मिळत नव्हता, तर काहींना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हतं. त्यातच आता ऑक्सिजन अभावी रूग्ण दगावले नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. एका लेखी उत्तरात केंद्राने ही माहिती दिली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.

केंद्राने दिलेल्या उत्तरावर खरोखरच विश्वास बसतोय का हे आधी विचारलं पाहिजे. ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी गेले, जे मेडिकल सिलेंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा तरी विश्वास बसतोय का?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकार खोटं बोलत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यात जे मृत झाले आहेत, त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं दिलेलं उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल, सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगॅससचा परिणाम आहे. सरकार भ्रमिष्ठ झालं आहे, अशी जहरी टीका देखील त्यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि केरळ ही दोन राज्यं कोरोनाचा सामना करत आहेत. उठसूठ केंद्रावर हल्ले करणं योग्य नाही. कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे. कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असताना महाराष्ट्राने काल बैठकीवर बहिष्कार टाकावं, हे योग्य नाही, असं मत देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, पेगॅससच्या मुद्द्यावर देखील राऊतांनी भाष्य केलंय. आज केंद्रात भाजप विरोधी पक्षात असला तर त्यांनी देखील जेपीसीची मागणी केली असती. यापूर्वीही भाजपने अशा मागण्या केल्या होत्या. आता आम्ही या मागण्या करत आहोत तर आमचं काय चुकलं? असा सवाल देखील त्यांनी भाजपला विचारला आहे.

थोडक्यात बातम्या-

“मुंबईकरांना खड्ड्यात घालण्याचं पूर्ण सामर्थ्य सत्ताधारी शिवसेनेत आहे”

पेट्रोल-डिझेलवरील करातून केंद्र सरकार मालामाल, तब्बल ‘इतकी’ कमाई

पहिल्यांदा गोळीबार… नेम चुकवून धावत सुटला तर पाठलाग करुन सपासप वार

जगाचं टेंशन वाढलं!; कोरोना गेला नाही तेच नोरो व्हायरसचा धुमाकूळ

“लोकांच्या जीवापेक्षा सण महत्त्वाचे नाहीत”, कत्तलीसंदर्भात कोर्टानं फटकारलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More