“मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”
मुंबई | शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद सुरु झाली आहे. या पत्रकार परिषदेला अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी हजेरी लावली आहे. पत्रकार परिषदेची सुरुवात करताच संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्रीय यंत्रणांवरही निशाणा साधल्याचं पहायला मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांनी चौकशीचा ससेमीरा लवल्याचं पहायला मिळत आहे. यावरुनच राऊत आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे .
पत्रकार परिषदेच्या आधी अनेक लोकं मला भेटली त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. “मला ती लोकं म्हणाली, केंद्रीय तपास यंत्रणा तुम्हाला टाईट करतील”. मात्र शिवसेना घाबरण्यातली नाही असं म्हणत राऊतांनी पलटवार केल्याचं पहायला मिळालं.
दरम्यान, आज होणाऱ्या परिषदेत विरोधी पक्षावर चांगलाच निशाणा साधला जाणार आहे. मविआ नेत्यांवर भ्रष्टाचार, घोटाळ्याचे आरोप केले जात आहेत. भाजपच्या याच आरोपांना आज शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येणार आहे.
थोडक्यात बातम्या –
“महाराष्ट्र गांडूची औलाद नाही आणि शिवसेना अजिबात घाबरणार नाही”
दाऊदप्रकरणी ईडीची मोठी कारवाई! राज्यातील एका मंत्र्याचीही चौकशी
Russia-Ukrain War | भारतीय नागरिकांना दुतवासानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना
Gold Rate | सोन्याचा दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा आजचे ताजे दर
“किरीट सोमय्यांचे आरोप हे TV वर येणाऱ्या जाहिरातींसारखे”
Comments are closed.