बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा धोका कमी; WHO ची माहिती

नवी दिल्ली |  सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असताना, अशातच डेल्टा व्हेरिएंट नावाच्या विषाणूने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे पुन्हा रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या सगळ्या विषाणुशी लढण्यासाठी सरकार सगळ्या जनतेला कोरोनाबाधित लस घेण्याचं आवाहन करत आहे. अशातच लसीसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं एक महत्वाची माहिती दिली आहे.

ज्या लोकांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन झाले आहेत, अशा लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा धोका कमी असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे. सोमवारी 12 जूलै रोजी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

जगभरातील पूर्ण लसीकरण झालेल्या म्हणजेच ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशा व्यक्तींनाही कोविड-19 ची लागण होत असल्याचे रिपोर्ट आम्हाला मिळाले आहेत. त्यातही अनेक जणांना कोविड-19 च्या डेल्टा व्हेरियंटची लागण होत आहे. पण एक गोष्ट दिलासादायक आहे की यापैकी बहुतांश रुग्णांमध्ये कोविडची लक्षणं खूप कमी प्रमाणात दिसून येत आहेत.

तसेच,जरी तुम्ही लस घेतली असली तरीही कोविड-19 चा संसर्ग तुम्हाला होऊ शकतो आणि तुमच्यामुळे इतरांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे मास्क वापरा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. परंतू, लसीकरणामुळे हॉस्पिटलायझेशन आणि कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये लक्षणीय घट झाली आहे, हे मात्र नक्की. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर, जगातील काही देशांमध्ये अजून पुरेसं लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे तिथे हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण अजूनही जास्त आहे आणि तिथं डेल्टा व्हेरियंटची लागण होण्याचं प्रमाण जास्त आहे. तिथं डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वेगाने पसरत असल्याचंही स्वामीनाथन यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत 118 दिवसातील निच्चांकी नोंद

भारतात कोरोनाची तिसरी लाट ‘या’ तारखेपासूनच सुरू झाली, वैज्ञानिकांनी केला धक्कादायक दावा!

‘कोरोना लसीचे डोस मिक्स घेऊ नका’ ; WHO चा गंभीर इशारा

माजी राज्यमंत्र्यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’; नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

राज्यात डिसेंबरपर्यंत पोलिस भरती; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More