Top News

…त्या दहा बालकांचा मृत्यू झाला नसून हत्या करण्यात आली आहे- राम शिंदे

मुंबई | भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरून भाजप नेते राम शिंदे यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर आरोप केलाय.

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. या दुर्घटनेत झालेला बालकांचा हा मृत्यू नसून या हत्या आहेत, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.

शनिवारी भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांच्या युनिट केअरमध्ये आग लागली. यानंतर युनिट केअरमध्ये धूर जमा झाल्याने 10 बालकांचा गुदमरुन मृत्यू झाला.

दरम्यान राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे यापूर्वी सुद्धा रुग्णालयात अनेक लोकांचे मृत्यू झालाय. हा निष्काळजीपणा आणखी किती दिवस राहणार, असा खडा सवाल राम कदम यांनी राज्य सरकारला केलाय.

थोडक्यात बातम्या-

मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; 6 दिवसांपासून ‘या’ गोष्टीची गुणवत्ता घसरली

राज्य सरकार हम चलायेंगे, मलाई भी हम खायेंगे, असं चालणार नाही- प्रसाद ला

‘हे घडायलाच नको होतं…’ भंडाऱ्याच्या घटनेवर मंत्री अमित देशमुख यांचं ट्विट

भंडाऱ्याच्या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा- प्रवीण दरेकर

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या