“ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत”

नवी दिल्ली | ज्यांना चौकीदाराची भीती आहे, तेच चोर असल्याचं अोरडत आहेत, असं म्हणत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

राहुल गांधी स्वत:च्या फायद्यासाठी राफेल व्यवहारावरुन खोटेनाटे आरोप करत आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

मुळात राफेल प्रकरणात कोणताच आरोप झाला नसल्याचा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. त्या प्रकरणाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत, असं बोलत शहांनी राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे.

सर्व चोर एकत्र होऊन, चौकीदाराला चोर म्हणू लागले, तरी जनता कधी चौकीदाराला चोर म्हणणार नाही, असंही अमित शहा म्हणाले.

दरम्यान, कशाच्या आधारे पंतप्रधान नरेंंद्र मोदींवर आरोप करण्यात आला याचा पुरावा द्या, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. 

महत्वाच्या बातम्या 

-‘त्या’ वादावर राष्ट्रवादीच्या आमदारांकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न!

-राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा – आमदार वारिस पठाण

-RAFALE DEAL: कोर्टाच्या निर्णयावर अनिल अंबानींना आनंदी आनंद गडे, वाचा पहिली प्रतिक्रिया

-भारतीय नव्या नोटांना नेपाळने घातली बंदी

-जिजाऊंचा उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘पत्नी’; शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या