बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इच्छुकांनो हे लक्षात ठेवा”; मनसेच्या वसंत मोरेंनी सांगितली मोठी गंमत

पुणे | पुणे महानगरपालिकेसह राज्यात उर्वरित 19 महानगरपालिकेच्या निवडणुका या ‘एक प्रभाग एक नगरसेवक’ या पद्धतीने होणार आहेत. येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणूकीचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्या धर्तीवर नविन प्रभाग रचना होणार आहे. त्यावर आता मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी त्यांना आलेल्या जुना अनुभव सांगितला आहे.

ज्यांना कोणाला 2022 ची पुणे महानगरपालिका निवडणूक लढवायची असेल त्यांनी जरूर वाचा म्हणत त्यांनी ट्विट केलं आहे. प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर होण्यास अगदी काहीच दिवस उरलेले आहेत. माझा 2017च्या निवडणूकीपुर्वीचा अनुभव असा की, 2017 साली राष्ट्रवादीची पुणे महानगरपालिकेत सत्ता होती, तर राज्यात भाजपची सत्ता होती. आता मात्र उलटे आहे राज्यात राष्ट्रवादीची सत्ता आहे तर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे, असं मोरे म्हणाले आहेत.

प्रभाग प्रारूप रचनेबाबत भाजपने जे पेरलं आहे, ते महाविकास आघाडीकडून उगवणारच. फक्त यावेळी इच्छुक लोकांनी मनसे सोडून विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर लक्ष ठेवावं. जसे जसे बॅनर, ज्या ज्या चौकात दिसतील तसा आपला वार्ड होणार हे निश्चित ठरवावं, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे. मी कोणी ज्योतिषी नाही पण, माझा 15 वर्षाचा अनुभव खोटा ठरणार नाही. ज्यांनी कोणी बॅनर लावले असतील किंवा लावणार असतील ते माझी पोस्ट वाचून नक्कीच हसतील, असं म्हणत त्यांनी राजकारण्यांना चिमटा काढला आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यात आढावा बैठका वाढल्या आहेत. पुणे महानगरपालिकेत नव्याने 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिका आता क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका झाली आहे. त्यामुळं पुणे महानगरपालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करताना दिसत आहेत.

पाहा ट्विट-

थोडक्यात बातम्या –

“काँग्रेसच्या माडीला पवारांचा टेकू”; दानवेंनी उडवली बाळासाहेब थोरातांची खिल्ली

मनोहर भोसले प्रकरणात नवी घडामोड, ‘त्या’ दोन जणांचा शोध सुरु!

अमरावतीच्या वर्धा नदीत मोठी दुर्घटना; बोट उलटून 11 जण बुडाल्याची भीती

कौतुकास्पद! मुलगी झाली म्हणून पाणीपुरी विक्रेत्यानं वाटली ‘इतक्या’ हजार लोकांना मोफत पाणीपुरी

मास्क किती दिवस लावायचं???; नीती आयोगाने दिलं स्पष्टीकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More