Top News देश राजकारण

ज्यांना पटत नसेल त्यांनी पक्ष सोडून बाहेर जावं; कपिल सिब्बल यांच्यावर टीका

नवी दिल्ली | बिहार निवडणुकीत काँग्रेसला म्हणावी तशी चांगली कामगिरी करता आली नाही. या निकालानंतर कपिल सिब्बल यांनी काँग्रेसने आता अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं.

या वक्तव्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी कपिल सिब्बल यांच्यावर टीका केलीये. सलमान खुर्शीद यांनी एक फेसबूक पोस्ट लिहित सिब्बल यांना सदैव संशय घेणारा व्यक्ती असं म्हटलंय.

या पोस्टमध्ये खुर्शीद म्हणतात, “सत्तेतून बाहेर असणं हे सार्वजनिक आयुष्यात स्विकारणं सोपं नाही. मात्र जनतेनेच तो कौल दिला असेल तर ती बाब आपण स्विकारली पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी आपल्या तत्त्वांशी तडजोड करावी लागणार असेल तर त्यापेक्षा अशी सत्ता सोडलेली बरी.”

दरम्यान एका मुलाखतीदरम्यान ज्यांना पटत नसेल त्यांनी पक्ष सोडून बाहेर जावं असाही सल्ला सलमान खुर्शीद यांनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या-

“अख्खा दिवस गेला पण काँग्रेस नेतृत्वाचं बाळासाहेबांबद्दल एक ट्विट किंवा मसेजही दिसला नाही”

योगी सरकारचा मोठा निर्णय, 23 नोव्हेंबरपासून शाळा, कॉलेज सुरु

राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव बिलातून कुठलाही दिलासा नाही- नितीन राऊत

“इतकंच म्हणेन सदाभाऊ… तुम्ही गेल्या घरी सुखी राहा”

मराठवाड्यात शिवसेनेशिवाय कोणीही येऊ शकणार नाही- चंद्रकांत खैरे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या