बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! 10 वी पास तरुणांना पोस्टात नोकरीची संधी; तब्बल इतक्या पदांसाठी भरती

नवी दिल्ली | राज्यात आणि देशात कोरानानंतर बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. नुकताच CMIE च्या दर्शवण्यात एक डाटा प्रसारित करण्यात आला आहे. या डाटानुसार मे मधील बेरोजगारीचा दर 7.1 वरुन जूनमध्ये 7.8 वर पोहोचला आहे, ग्रामीण भागात 8 इतकी झाली आहे. हे प्रमाण भयावह आहे.

अनेकदा काही कारणास्तव शिक्षण कमी झालं असल्याने शासकीय नोकरीची (Government job) अपेक्षा असूनही नोकरी करू शकत नाहीत. मात्र आता ते त्यांच स्वप्न पूर्ण करू शकतात. कारण भारत सरकारच्या इंडिया पोस्टमध्ये  नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. यासाठी इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2022 च्या रिक्त जागांसाठी अर्ज मागितला आहे.

इंडिया पोस्ट भरती (India Post Recruitment 2022) साठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 20 जुलै आहे. रिक्त पदाची संख्या 24 आहे. यासाठी उमेदवाराचे पात्रता निकष पुढील प्रमाणे आहेत. उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. अर्ज मिळाल्याच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांची वयोमर्यादा 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

याशिवाय उमेदवार www.indiapost.gov.in/vas/pages या लिंकद्वारे या पदासाठी थेट अर्ज करू शकतात. तसेत या लिंकद्वारे इंडिया पोस्ट ड्रायव्हर भर्ती 2022 अधिसूचना PDF, मिळू शकते. याद्वारे अधिकृत अधिसूचनाही तुम्ही तपासू शकता. उमेदवार अर्ज भरून सीनियर मॅनेजर (जेएजी), मेल मोटर सर्व्हिस, क्र. 37, ग्रीम्स रोड, चेन्नई- 600006 वर पाठवू शकतात.

थोडक्यात बातम्या

बंडखोर आमदारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले…

शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर संतोष बांगर यांचं उद्धव ठाकरेंना चॅलेंज, म्हणतात…

श्रीलंकेचे गायब झालेले राष्ट्रपती गोटाबायांनी उचललं मोठं पाऊल, अधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना संतप्त, शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया समोर

कोट्यवधींचं घर खरेदी करत रणवीर-दीपिका झाले शाहरूखचे शेजारी, घराची किंमत ऐकून थक्क व्हाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More