बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्ता गेल्याने त्यांच्या पोटात दुखतंय, पण कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार”

मुंबई | सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलंय. त्यामध्ये त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलंय.

प्रताप सरनाईकांनी केलेल्या मागणीमुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर पडलं असल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेना पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत मजबुतीने उभे आहोत. सत्ता गेल्याने ज्यांच्या पोटात दुखत आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार. कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही, असं संजय राऊत म्हटलं आहे.

आज संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. तसेच महाविकास आघाडीमध्ये असणारा समन्वय देशाच्या राजकारणात आदर्श आहे. आघाडीचं सरकार कसं चालवावं त्याचा उत्तम फॉर्म्यूला महाराष्ट्रात आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी विरोधी पक्ष भाजपला टोला लगावला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षामध्ये गटबाजी आहे?, असा प्रश्न राऊतांना विचारण्यात आला. यालाही संजय राऊत यांनी उत्तर दिलं. आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत, असं राऊत म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“आम्ही वाघाच्या काळजाचे, शिवसेना प्रताप सरनाईकांच्या पाठिशी ठाम उभी”

“एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच, पण शिवसेनेला हात लावायचं नाही हे ठरलंय”

“स्वबळाची भाषा करण्याआधी फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे”

“चव्हाण मुख्यमंत्री असतानाच जनतेनं काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारला घरी बसवलं”

देशभरात कोरोना रूग्णसंख्येत कमालीची घट; गेल्या 88 दिवसातील सर्वाधिक कमी रुग्णसंख्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More