बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ज्यांनी लस घेतली, त्यांनी मास्क लावायची गरज नाही’; ‘या’ देशाची मोठी घोषणा

नवी दिल्ली | जगभरात मागच्यावर्षीपासून कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं. कोरोनामुळे अनेकांना आपल्या जवळच्या व्यक्तींना कायमचं गमवावं लागलं. त्यानंतर हळू हळू कोरोना आटोक्यात येत गेला. पण त्यानंतर दुसरी लाट सक्रिय झाली. अमेरिकेत तर तिसऱ्या लाटेनही थैमान घातलं व नागरिकांचं जगणं मुश्कील करून टाकलं. आता मात्र अमेरिकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.

अमेरिकेत कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत भयावह आणि गंभीर परिस्थिती पाहायला मिळत होती. जगातील सर्वाधिक रुग्णसंख्या अमेरिकेत असल्याचे चित्रही काही दिवसांपूर्वी दिसून आलं पण आता अमेरिका इस्रायलनंतर कोरोनावर विजय प्राप्त करत असल्याचं निदर्शनास येत आहे. कारण तेथिल रूग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे.

अमेरिकेच्या सरकारने नागरिकांना गर्दीचे ठिकाण सोडून इतर ठिकाणी फिरताना मास्क वापरण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ज्या लोकांनी कोरोना लसीकरण पूर्ण केलं आहे, अशा लोकांनी शहरात कुठेही फिरताना मास्क घालणं बंधनकारक नसल्याचं अमेरिकेची आरोग्य संस्था सीडीसीने स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेच्या आरोग्य संस्थेने स्पष्ट केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी देखील ट्वीट करून या गोष्टीची माहिती दिली. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की लसीकरण तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही वाचवण्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे सर्वांनी लसीकरण करून घेतलं पाहिजे. अमेरिकेत अर्ध्यापेक्षा जास्त लोकांनी कोरोना लसीचा डोस घेतला आहे. त्यामुळे आता अमेरिका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

केंद्र सरकार ‘या’ जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लावण्याच्या तयारीत; आरोग्य मंत्रालयाचा प्रस्ताव

…म्हणून त्यावेळी थांबवला होता दिल्ली आणि बंगळूरूचा आयपीएल सामना

कोल्हापूरात विनाकारण बाहेर फिरताना दिसल्यावर वाहन जप्त होणार; कोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई

धोका वाढला! मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, जाणुन घ्या मागच्या 24 तासातील आकडेवारी

‘खूपच घाई असेल तर प्रश्न पाठवा उत्तरं देते’; रश्मी शुक्ला यांचं महाराष्ट्र पोलिसांना उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More