बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपमध्ये गेलेले पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक, माझ्याकडे काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची मोठी यादी”

अमरावती | भाजपमध्ये गेलेली नेतेमंडळी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची आपल्याकडे मोठी यादी आहे, पण आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय.

नाना पटोले सध्या मिशन विदर्भ अंतर्गत विदर्भातील जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. त्यावेळी त्यांनी अकोला आणि अमरावतीमध्ये काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं पुन्हा एकदा म्हटलंय. भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, असं पटोले यांनी पुन्हा एकदा जाहीर केलंय.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्र जोमाने लढतील, अशी घोषणाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी केली. मात्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढेल, असा पुनरुच्चार नाना पटोले यांनी केलाय.

धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आघाडीच्या दृष्टीने प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करणार आहे. आंबेडकर आणि काही छोट्या राजकीय पक्षांसोबत आघाडी करण्यासाठी चर्चा करण्यात येईल. मात्र अद्याप कुणाशीही चर्चा सुरू झाली नसल्याचं पटोलेंनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘नागरिकांसोबत मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही’; नितीन राऊतांचा अधिकाऱ्यांना दम

छोरी धाकड है! खुल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

“चीनच्या कपटनीतीवर लक्ष ठेवावंच लागेल, गाफील राहून चालणार नाही”

पुण्याचा श्वास आणखी थोडा मोकळा होणार; वाचा 14 जूनपासून काय सुरु, काय बंद?

सहकारमहर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे यांचं निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More