‘औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांना…’; संजय राऊतांचा इशारा
मुंबई | राज्यात भोंग्याच्या मुद्द्यावरुन अनेक वाद होत असलेले पहायला मिळत आहे. अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये सभा घेतली. सभेपूर्वी त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतलं. यावरुनच सध्या आरोपांचा कलगितुरा रंगला असून संजय राऊत यांनीही ओवैसींवर निशाणा साधला आहे.
औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकणाऱ्यांना त्याच मातीत गाडू. औरंगजेबाला मराठ्यांनी याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडले आहे. तुम्ही जर आम्हाला आव्हान देणार असाल तर आम्ही तुमचे आव्हान स्वीकारुन त्याच मातीमध्ये गाडू, असा इशारा संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, देशात द्वेष पसरवला जातोय. पण मी प्रेम पासरवतो. कुणाला घाबरण्याची गरज नाही. ज्याला कुणाला वाटत असेल आम्ही घाबरू पण ऐकून घ्या, आम्ही घाबरणार नाही. इस्लाम आधी नाही संपला आता कोण संपवणार?, असं अकबरुद्दीन यांनी औरंबादच्या सभेत म्हटलं होतं.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ
“लोकांना सतत भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात जगण्यास भाग पाडले जात आहे”
“मी माणसांच्या जंगलातले 2 खरे वाघ पाहिलेत, एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे…”
रशियाचा पुन्हा आक्रमक पवित्रा; पुतिन यांचा ‘या’ देशाला गंभीर इशारा
राज्यात ‘या’ भागात तीव्र उष्णतेची लाट, वाचा हवामान खात्याचा इशारा
Comments are closed.