बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्यांची बुद्धी कमी असते, त्यांना माझं वक्तव्य समजलं नाही”

मुंबई | राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केलेल्या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा सुरू आहे. मला अजूनही राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे, असं फडणवीस म्हणाले होते. मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मला अजूनही राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटत आहे. या तुमच्या वक्तव्यावर टीका होत आहे, असं फडणवीस यांना विचारण्यात आलं, त्यावर त्यांनी उत्तर दिलं. टीका करणाऱ्यांनी जर माझं वक्तव्य पूर्ण ऐकलं असतं, तर त्यांनी माझ्यावर अशा प्रकारची टीका केलीच नसती, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

मी स्पष्टपणे सांगितलं आहे की, माझ्यासोबत जे लोक आहेत. त्या लोकांनी मला कधीही असं वाटू दिलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही. त्या लोकांचा मला खंबीर पाठिंबा आहे. लोकांचा मला कसा प्रतिसाद आहे हे मी सांगितलेलं आहे. पण काही लोकांची बुद्धी थोडी कमी असते. ज्यांची बुद्धी कमी असते त्यांना माझं वक्तव्य समजलं नाही. त्यामुळं कमी लोकांच्या बुद्धीवर मी बोलणार नाही, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी बेलापूरच्या महिला मासळी विक्रेत्यांना परवाना वाटपाचा कार्यक्रम पार पडला. त्या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला, त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं.

थोडक्यात बातम्या –

अखेर बळीराजाला मदत! ठाकरे सरकारनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“ती ऑफर न स्वीकारायला शरद पवार काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत”

मोदी सरकारचा खासगीकरणाचा सपाटा सुरुच, आता विकणार ‘ही’ कंपनी

फडणवीसांना मुख्यमंत्री असल्यासारखं का वाटतं?, चंद्रकांत पाटलांनी सांगितलं खरं कारण

“…असं यापूर्वी कधीच घडलं नव्हतं”; शरद पवार भाजपवर संतापले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More