बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने…’; शरद पवारांचा फडणवीसांवर निशाणा

पुणे | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. बऱ्याच वर्षांनी मी पिंपरीत आलो आहे. मला चार वेळा इथल्या लोकांनी लोकसभेमध्ये पाठवलं आहे. सामान्य जनतेचे आज प्रश्न वाढत आहेत. मात्र मोदी सरकारला जनतेच्या प्रश्नांची आस्था नाही, अशी टीका शरद पवारांनी केली आहे.

आज शरद पवारांनी बोलताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.  केंद्र सरकार केंद्रीय संस्थांचा गैरमार्गाने वापर करत आहे. अनिल देशमुख यांच्यावरील झालेले आरोप आणि त्यांनी लगेच राजीनामा दिला. ज्या पोलीस आयुक्तांनी आरोप केले ते आयुक्त आरोप करून गायब आहेत. मोदी सरकार आयुक्त कुठं गेले आहेत, याची माहिती मोदी सरकार देत नाहीत. मोदी सरकारने त्यांच्या माहिती देणाऱ्या संस्थांचा वापर करून माहिती द्यावी, अशी मागणी पवारांनी मोदी सरकारकडे केली आहे.

राज्यात सत्ता नसल्यानं मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस सत्ता नसल्यानं अस्वस्थ आहेत. तसेच ईडी आणि एनसीबी सारख्या संस्था आधी खूप कमी लोकांना माहित होत्या. पण आज या संस्थांची नावे लोकांना नावं ऐकायला येतात. नवाब मलिकांच्या जावयाला एनसीबीचा वापर करून ससेमिरा लावला. त्यानंतर त्यांना मिळालेल्या जामिनावरून पवारांनी तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच एनसीबीच्या कारवाई दरम्यान जे पंच आणतात, ते सर्व पंच गुन्हेगार आहेत. त्यांचा खरा चेहरा समोर आला की ते सर्व फरार झाले आहेत, अशी टीका देखील शरद पवारांनी यावेळी केली.

दरम्यान, आयकर विभाग धाडी टाकतात आणि त्या धाडीची माहिती भाजपचे लोक देतात. तपास यंत्रणा फक्त चांगल्या लोकांवर खोटे नाटे पुरावे सादर करायचे आणि गुन्हे दाखल करायचे. तपास यंत्रणा फक्त लोकांना बदनाम करण्यासाठी काम करत आहेत, असा गंभीर आरोप शरद पवारांवर मोदी सरकारवर केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

‘…म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला’; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

फडणवीस-मुंडे वाद पुन्हा शिगेला???; ‘त्या’ प्रश्नावर फडणवीसांनी सोडली पत्रकार परिषद

…जेव्हा ‘द वाॅल’ म्हणतो, “तो माझ्यासाठी काही अभिमानाचा क्षण नव्हता”

पुढील 48 तास धोधो पाऊस; ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

‘मलिकांना मिरच्या का झोंबल्यात?…’ नवाब मलिकांच्या आरोपावर फ्लेचर पटेलांचं प्रत्युत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More