Top News महाराष्ट्र मुंबई

ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये- बाळासाहेब थोरात

मुंबई | जम्मू काश्मिरमधील गुपकर डिक्लेरेशनमध्ये काँग्रेसही सहभागी असल्याचा आरोप विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

ज्यांचे पूर्वज स्वातंत्र्यांच्या लढ्यात इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

सातत्याने खोटे बोलून जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करणे ही भाजप नेत्यांची जुनी सवय आहे. देवेंद्र फडणवीसांनीही याच सवयीला जागून पत्रकार परिषदेत काश्मिरबद्दल बोलताना काँग्रेस पक्षावर खोटे आरोप करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असल्याचे थोरात यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

काँग्रेस पक्ष गुपकर डिक्लेरेशनमध्ये सहभागी नाही. काँग्रेसचा गुपकर डिक्लेरेशनशी कोणताही संबंध नाही. बोलण्याच्या आधी त्यांनी जरा माहिती घेतली असती तर जरा बरे झाले असते, असही थोरात म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘भाजप येणार, मुंबई घडवणार’; महापालिका निवडणुकीची भाजपची तयारी

कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय; पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन

“शिवसेनेने गेल्या अनेक वर्षात मुंबईचं वाटोळं करण्याचं पाप केलंय”

आटपाडीत संजयकाका-पडळकर गटात मारामारी

वीजबिलांवरून राज्य सरकारने जनतेचा विश्वासघात केलाय- देवेंद्र फडणवीस

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या