बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

स्वबळावरच लढणार!; नाना पटोलेंच्या नव्या भूमिकेनं महाविकास आघाडीला मोठा धक्का

नागपूर | राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी विधानसभा आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे. नागपूरमध्ये आले होते तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना नानांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

रश्मी शुक्लाच नव्हे तर कुठल्याही अधिकाऱ्याने राजकीय पक्षाला समर्पित होऊ काम करणे लोकशाहीला घातक असल्याचं पटोले म्हणाले. तर रश्मी शुक्ला यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जे समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल आणि फडणवीस यांच्या खोट्या आरोपांमुळे सरकार पडणार नाही, असंही पटोले यांनी म्हटलं आहे. भाजपवरही पटोलेंनी टीका केली.

सत्ता गेल्यामुळे भाजपचे नेते चांगलेच अस्वस्थ आहे. पुन्हा सत्तेवर येण्याची धडपड त्यांची सुरू आहे. राज्याला बदनाम करण्याचेही काम केले जात आहे. सुशांतसिंग, परमवीर सिंग प्रकरणामुळे राज्याची बदनामी होत आहे. यानंतरही भाजपचा खोटे बोलण्याचा उद्योग सुरूच आहे. त्यामुळे काही साध्य होईल, असं दिसत नाही, असं म्हणत नानांनी भाजपला टोला लगावला.

दरम्यान, भाजप सरकारच्या काळात झालेले अनेक घोटाळे आणि प्रकरणं आता समोर येणार आहेत. यामध्ये जस्टिस लोया प्रकरणाचाही समावेश आहे. आम्ही याबाबात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळेच भाजप आरोप करत लक्ष दुसरीकडे वळवळ्याचा प्रयत्न करत असल्याचं पटोलेंनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या- 

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

…म्हणून दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणात माजी वनमंत्री संजय राठोड याचं नाव चर्चेत!

ठाकरे सरकारने सांगितलेला ‘हा’ नवा नियम पाळा, अन्यथा भरावा लागेल 1000 रुपये दंड

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाची स्थिती भीषण, अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत रांगा

‘सचिन सावंतांना उत्तर द्यायला भाजपचे ‘हे’ नेते खंबीर’; फडणवीसांनी उडवली खिल्ली

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More