बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्य सरकारचा पूरग्रस्तांना दिलासा; करणार इतक्या हजार कोटींची मदत

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासुन दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा बरसायला सुरूवात झाली आहे. त्यातच कोकणासह इतरही महाराष्ट्रात पावसाने जोरदार बॅटींग करायला सुरूवात केली. त्यातच अनेक ठिकाणी धुवांधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने नुकसानग्रस्त भागाला तब्बल 701 कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. त्यातच आता राज्य सरकार कधी पॅकेज घोषित करणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल बैठक पार पडली.

कालच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार राज्य सरकारतर्फे 5 हजार कोटी किंवा त्याहुनही अधिकचं पॅकेज जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगलीला 2019 मध्ये झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभुमीवर देण्यात आलेल्या मदतीनुसारच यंदाच्या नुकसानीची मदत दिली जाऊ शकते. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कमेची व्यवस्था कशी करायची याचाही विचार केला जात आहे.

अतिवृष्टी व दरड कोसळुन झालेल्या नुकसानीच्या बदल्यात व्यापाऱ्यांनाही आर्थिक मदत दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच व्यवयाय उभारण्यासाठी अल्प दरात सरकार कर्ज उपलब्ध करून देऊ शकते. आज याबाबतीत निर्णय होऊ शकतो. त्यामुळे राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा ताजी आकडेवारी

‘भारत जातीवादाने नाही तर वर्णभेदानेही बाधित आहे’; मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली

धक्कादायक! पुणे नगरसेवकांचा भोंगळ कारभार उघड, पालिकेच्या पैशांवर सुरू आहेत ‘ही’ कामे

हाच खरा बाहुबली! डोक्यावर दुचाकी उचलणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दिलासादायक! मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More