महाराष्ट्र मुंबई

‘राज्यात हजारो रोजगार उपलब्ध होणार’; ठाकरे सरकारचा 15 कंपन्यांसोबत सामंजस्य करार

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आल्या आहेत.

राज्यात एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य लवकरच पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

15 कंपन्यांमार्फत जवळपास 34 हजार 850 कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे सुमारे 23 हजार 182 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

गुंतवणूकदार आणि राज्य शासन यांचा एकमेकांवर विश्वास आहे. गेल्या सामंजस्य करारातील अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. जवळपास 60 टक्के उद्योगांच्या बाबतीत जमीन अधिग्रहणासारख्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत ही निश्चितच समाधानाची बाब आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या-

मुकेश अंबानींना मोठा धक्का; फोर्ब्स बिलेनियर्सच्या यादीत अंबानींची 9 व्या स्थानी घसरण

कमलनाथ यांचा दर्जा परत घेण्याच्या आदेशाला स्थगिती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले…

पंजाब पाठोपाठ राजस्थानमध्ये देखील मोदी सरकारला झटका!

महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?; मनसेचा सवाल

“मुंबई आमची आहे, मुंबईच्या वाट्याला जाऊ नका”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या