बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई विमानतळावर ‘इतके’ हजार प्रवासी आढळले कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. अशात एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

मुंबईत आलेले 3 हजार 310 प्रवासी करोनाबाधित असल्याचं आढळलं आहे. गेल्या दहा महिन्यांत मुंबई विमानतळावर केलेल्या चाचण्यांमध्ये हे प्रवासी बाधित आढळल्याची माहिती पालिकेने दिली आहे.

डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2021 पर्यंत मुंबईत आलेले एकूण तीन हजार 310 प्रवासी करोनाबाधित असल्याचं आढळलं आहे. यात देशांतर्गत प्रवासातून मुंबईत आलेल्या दोन हजार 198 प्रवासी आणि एक हजार 112 आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे. 2 लाख 41 हजार 23 देशांतर्गत विमान प्रवाशांच्या, तर एक लाख 80 हजारपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या करोना चाचण्या मुंबई विमानतळावर करण्यात आल्या होत्या.

दरम्यान, बुधवारी दिवसभरात देशात 31 हजार 382 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 318 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या सहा महिन्यांतील निचांकावर पोहोचली आहे.

थोडक्यात बातम्या- 

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं

मराठवाड्याच्या निलेशची UPSC मध्ये गगनभरारी, सलग दुसऱ्यांदा मिळवलं यश

“सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या उबवायचं काम करु नका, राजीनामा द्या”

‘मनापासून माफी मागतो’; राजेश टोपेंनी विद्यार्थ्यांची मागितली माफी

…तरच जीएसटीच्या कक्षेत येणार पेट्रोल आणि डिझेल- निर्मला सितारामन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More