देश

59 चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्याने भारतातील ‘इतके’ हजार कर्मचारी होणार बेरोजगार!

नवी दिल्ली | केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे. तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट ‘डिजिटल स्ट्राईक’ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र या बंदीनंतर या कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो भारतीय बेरोजगार होण्याची चिन्ह दिसत आहेत.

भारत सरकारने बंदी घातलेल्या अ‍ॅपच्या यादीमध्ये केवळ मोजकी अ‍ॅपही प्रचंड लोकप्रिय होती. बंदी घालण्यात आलेल्या 59 चिनी अ‍ॅप्सपैकी भारतात असणाऱ्या शाखांमध्ये केवळ 10 ते 12 लोकं काम करायची. या 59 पैकी बहुतांश कंपन्या भारतामध्ये अगदी अल्प मनुष्यबळाच्या मदतीने काम करत होत्या.

अनेक कंपन्यांमध्ये 10 ते 12 हून अधिक जण काम करतात त्यामुळे या कंपन्यानी भारतामधून गाशा गुंडळल्यास अंदाजे 10 ते 12 हजार जणांच्या नोकऱ्या जाणार असल्याचं दिसत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! कोरोनावरील पहिली लस भारतात तयार

मुंबईत विनामास्क फिरल्यास भरावा लागणार ‘इतका’ दंड; पालिकेकडून आदेश जारी

“…तर सुशांतने भारतासाठी ऑस्कर जिंकला असता”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या