पुणे | राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष पद्मश्री गणेश देवी यांनी महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतातील तरुणांना जोडीदार निवडताना जातीचा वा धर्माचा विचार न करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला महाराष्ट्रातून हजारो तरुणांनी प्रतिसाद दिला आहे.
राज्यातील 4500 तरुणांनी लग्नाच्या वेळी जोडीदाराची निवड करताना जाती-धर्माचा विचार करणार नसल्याचा आपला निर्णय गणेश देवींना सांगितला आहे.
गणेश देवींनी तरुणांना 2 ते 10 ऑक्टोबर या काळात आपला निर्णय कळवण्याचं आवाहन केलं होतं. तसेच रोज प्रत्येकी किमान 100 तरुणांचा सकारात्मक प्रतिसाद आला नाही, तर त्या दिवशी उपोषण करण्याची घोषणाही केली होती.
राज्यातील जवळपास 4500 तरुणांनी गणेश देवींना ईमेलद्वारे आपला निर्णय कळवला. या काळात देवी यांनी युवकांना वाचण्यासाठी आणि आपल्या निर्णयाच्या बाजू समजून घेण्यासाठी अनेक विषयांवरील लेखही उपलब्ध करुन दिले.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांना स्वस्थ बसू देणार नाही- उद्धव ठाकरे- https://t.co/QPbcXsDy3p #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
एका लुगड्यानं बाई म्हातारी होत नाही- चंद्रकांत पाटील – https://t.co/TTHCIXB1DG @ChDadaPatil @SanjayMandlik99 @ShivSena
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
जनता हे सरकार उलथून टाकणारच; अमोल कोल्हेंचा दावा – https://t.co/rAopeADlHY @kolhe_amol @NCPspeaks @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 12, 2019
Comments are closed.