निवडणुकीच्या काळात झिशान सिद्दीकींच टेन्शन वाढवणारी बातमी समोर!

Zeeshan Siddiqui

Zeeshan Siddiqui l दसऱ्याच्या दिवसाची म्हणजेच 12 ऑक्टोबरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मात्र त्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आता बाबा सिद्दीकी यांच्या मुलाला म्हणजेच झिशान सिद्दीकी यांना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.

झिशान सिद्दीकी यांना पुन्हा धमकीचा फोन :

विधानसभा निवडणुकीत झिशान सिद्दीकी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वांद्रे पूर्व या भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र आता झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्व येथील जनसंपर्क कार्यालयातील फोनवर धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळातच झिशान सिद्दीकी यांना धमकीचा फोन आल्याने त्यांच्यासह सर्वच कार्यकर्त्यांचं टेन्शन वाढलं आहे.

Zeeshan Siddiqui l बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागचं कारण काय? :

याशिवाय झिशान सिद्दीकी यांचे वडिल बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आलेल्या घटनेचे कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाहीत. मात्र या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागचं कारण म्हणजे बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची मैत्री चांगली असल्याने त्यांची हत्या करण्यात आली आहे असं बोललं जात आहे.

अशातच आता झिशान सिद्दीकी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आल्याने फोनवरील व्यक्तीने झिशान सिद्दीकी आणि अभिनेता सलमान खान यांना मारण्याची धमकी दिली आहे. यासोबतच पैशांची मागणी देखील केली आहे. मात्र आता याप्रकरणी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याने निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

News Title – Threat call to baba siddiqui son zeeshan siddiqui

महत्त्वाच्या बातम्या-

सरकारचा मोठा निर्णय! दिवाळीच्या काळात बदलणार अनेक नियम

तिकीट न मिळाल्याने नाराजी, मुंबईत महायुतीच्या तीन जागांवर बंडखोरी

आत्महत्येची भाषा करणारे आमदार वनगा कालपासून बेपत्ता, मुख्यमंत्र्यांचा तातडीने फोन

मनसेची सातवी यादी जाहीर, पारनेरमध्ये लंकेंविरोधातही दिला उमेदवार

अजित पवार गटाची चौथी यादी जाहीर, महायुतीत NCP ला किती जागा मिळाल्या?

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .