मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्बने उडवण्याची धमकी

Maharashtra

Eknath Shinde | शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून ई-मेलद्वारे शिंदेंची गाडी बॉम्बने उडवण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार गोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

धमकीचा हा ई-मेल मुंबईतील जवळपास 7 ते 8 पोलीस ठाण्यांसह इतर महत्त्वाच्या सुरक्षा विभागांना पाठवण्यात आला आहे. या मेलमध्ये शिंदेंवर हल्ला करण्याचा कट असल्याचे उल्लेख असून, त्यांना बॉम्बने उडवण्यात येईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी या धमकीला गांभीर्याने घेत तपासाच्या हालचाली वेगवान केल्या आहेत.

एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी 

मुंबई पोलीस आणि सायबर क्राईम विभाग ई-मेल पाठवणाऱ्याचा शोध घेत आहेत. कोणत्या ठिकाणावरून हा मेल पाठवण्यात आला? यामागे कोणते गट सक्रिय आहेत? हे शोधण्यासाठी सायबर सेलकडून तांत्रिक तपास सुरू आहे. तसेच, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. (Eknath Shinde)

या घटनेमुळे राज्याच्या राजकीय आणि सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालय याकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी लवकरच धमकी देणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कडक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Title : Threat Email Sent to Eknath Shinde 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .