मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

बाॅलीवुडच्या ‘दबंग खान’ला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अखेर अटक

Loading...

मुंबई | बाॅलीवुडचा ‘दबंग’ सलमान खानला काही दिवसांपुर्वी फेसबुकवरुन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोस्ट व्हायरल झाल्यावर पोलिसांनी आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर, याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

गाडी चोरी करुन पळ काढणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होतं. त्यांच्या चौकशीदरम्यान सलमानला जीवे मारण्याची धमकी यांनीच दिल्याचे उघड झालयं. जॅकी बिन्शोई अशी  आरोपींची ओळख असुन ते  सोपू संघटनेशी जोडलेले आहेत.

Loading...

बरोबरच त्यांनी हे कृत्य फक्त लोकप्रियतेसाठी केल्याचं सांगितलंय. दोन्ही आरोपी कार चोरी आणि अंमली पदार्थांची विक्री करतात. कार चोरी करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि चौकशीदरम्यान हे प्रकरण उघडकीस आलं.

पोलिसांनी त्यांच्या फोनची तपासणी केली असता सलमानला जीवे मारण्याच्या धमकी दिलेला फोटो त्यांच्या फोनमध्ये आढळला, असं पोलिस अधिकारी प्रविण आचार्य यांनी सांगितलयं. या प्रकरणाबद्दल सलमानचे चाहते फेसबुकवर नाराजी व्यक्त करत आहेत.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या:

 

Loading...

 

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या