Salman Khan | बॉलीवूड अभिनेता सलमान खान याला काही दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे त्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र, धमकीचे फोन आणि मेसेज येण्याचे हे सत्र काही थांबण्याचं नाव घेईना. सलमानला काल रात्री (7 नोव्हेंबर) पुन्हा एकदा धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Salman Khan )
अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा बिष्णोई गँगकडून धमकीचा मेसेज आला आहे. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला सलमानला आलेल्या धमकीचा मेसेज आला आहे. यामध्ये सलमान खान आणि लॉरेन्स बिष्णोई याच्यावर लिहिण्यात आलेल्या गाण्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सलमानला पुन्हा धमकीचा मेसेज
“ज्याने कुणी गाणं लिहिलं आहे, त्याला आम्ही सोडणार नाही”, असं धमकीच्या मेसेजध्ये नमूद करण्यात आलंय. फक्त एकच महिना… एकाच महिन्याच्या आत गाण लिहिणाऱ्या व्यक्तिला मारणार, गाणं लिहिणाऱ्याची हालत अशी करणार की, तो यापुढे नव्यानं गाणं लिहूच शकणार नाही, असं मेसेजमध्ये म्हटलंय. (Salman Khan )
सलमान खानमध्ये जर दम असेल तर त्याने गाणं लिहिणाऱ्याला वाचवावं.. अशा आशयाचा मेसेज आल्याचं समोर येतंय. या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले असून मेसेज करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांची हत्या झाल्यापासून सलमानला सतत धमकीचे मेसेज आणि कॉल्स येत आहेत.
‘ते’ गाणं लिहिणाऱ्याला संपवण्याचा इशारा
या पार्श्वभूमीवर सलमान खानला मोठी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. सलमान खानचं वांद्रे येथील घर, त्यानंतर तो जिथे जाईल ते शुटिंग डेस्टिनेशन किंवा सेट सगळीकडे त्याला पोलिसांची सुरक्षा दिली जात आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या घरावर गोळीबार देखील करण्यात आला होता. त्यातच त्याला सतत धमकी दिली जात असल्याने चाहतेही आता चिंतेत पडले आहेत. (Salman Khan )
News Title : Threatening message to Salman Khan again
महत्त्वाच्या बातम्या-
“राजसाहेब तुम्हाला बडव्यांनी घेरलंय, वेळीच सावध व्हा..”; ‘या’ नेत्याचं ट्वीट चर्चेत
रवि योगाचा शुभ संयोग ‘या’ 5 राशींना करणार धनवान, मिळणार पैसाच पैसा!
प्रमोद महाजनांच्या हत्येवरून पूनम महाजनांचं मोठं विधान!
18 वर्षांनंतर प्रमोद महाजनांच्या हत्येसंदर्भात खळबळजनक दावा समोर!