बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नितीन गडकरींनी नगर जिल्ह्यासाठी केल्या ‘या’ तीन मोठ्या घोषणा!

अहमदनगर | केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अहमदनगरमध्ये विकासकांमांचं भूमिपूजन करण्यात आलं. या कार्यक्रमामध्ये बोलताना नितीन गडकरींनी अनेक घोषणा केल्या. यामध्ये नगर जिल्ह्यासाठी तीन मोठ्या घोषणा केल्या आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.

तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड आणि पाटोदा हा 548 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक, जामखेड ते सौताडा या रस्त्याचं 135 कोटीचं काम आणि जामखेड शहरातून जाणारा जामखेड ते बीड जोडणारा महत्त्वाचा मार्ग मी अॅन्यूअल प्लॅनमध्ये मंजूर करणार असून त्याचं काम लगेच सुरू होणार असल्याचं गडकरी म्हणाले.

तळेगाव, चाकण, शिक्रापूर, नावरा, श्रीगोंदा, जामखेड आणि पाटोदा हा दौंड-मनमानमाड रेल्वे मार्गावर आहे. निम्मन गाव येथे रेल्वे उड्डाण पुलाचं काम मी मंजूर करत आहे, हे काम लवकर सुरू होईल, असं गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोपरगाव ते सावळी विहीर हे मालेगाव-मनमाड-अहमदनगर हा दक्षिण आणि उत्तरेला जोडणारा अवजड वाहनांचा रस्ता आहे. शिर्डीला जोडणारा हा रस्ता आहे. त्यांचंही काम मी मंजूर करत आहे. त्यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, अशी घोषणाही गडकरी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या- 

खड्ड्यांवरुन ठाकरे बंधूंमध्ये जुंपली; अमित ठाकरेंच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

काँग्रेस पक्ष हेडलेस असल्यानं भाजप नेते त्याचा फायदा घेत आहेत – संजय राऊत

कंगना रणौत योगींच्या भेटीला, ‘या’ मोहिमेची बनली ब्रँड अॅम्बेसिडर

.अन् या पठ्ठ्याने नवरीला नेण्यासाठी थेट जेसीबीच मागवला, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More