बीड महाराष्ट्र

“राष्ट्रवादी काँग्रेसनं बनवाबनवी केली, ते पंचायत समिती सदस्य भाजपमध्येच”

बीड | पंचायत समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं सांगण्यात आलं. पण ते तीनही सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा परळी भाजपकडून करण्यात आलाय.

पंचायत समिती सभापती उर्मिला गित्ते यांच्याविरोधात गुरुवारी अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं प्रसिद्धी पत्रक राष्ट्रवादीकडून जारी करण्यात आलंय.

राष्ट्रवादीनंतर भाजपनंही एक प्रसिद्धी पत्रक काढून ते सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा केला आहे. त्या सदस्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या बातम्या देत राष्ट्रवादी काँग्रेसनं बनवाबनवी केल्याचा आरोप भाजपनं केलाय.

भाजपचे पंचायत समिती सदस्य असलेले भरत सोनावणे, मुरलीधर साळवे आणि मोहन आचार्य यांनी पंकजा मुंडे यांच्यावर आपला विश्वास आहे. आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसल्याचं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

सुशांत सिंग राजपूतच्या कामाची उच्च न्यायालयाने केली प्रशंसा

हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू

येत्या 24 तासांत ‘या’ भागात पावसाचा अंदाज!

नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, 2 बडे नेते शिवसेनेत प्रवेश करणार

राज्यातील नव्या कोरोना स्ट्रेनचे तिन्ही प्रवासी पिंपरी चिंचवडचे- राजेश टोपे

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या