बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंताजनक! म्युकरमायकोसिसमुळे मुंबईत तीन लहान मुलांचे डोळे काढावे लागले

मुंबई | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशात मुंबईत म्युकरमायकोसिसमुळे नुकतीच तीन लहान मुलांचे डोळे काढण्याची वेळ ओढावली. या तिन्ही मुलांचे वय चार, सहा आणि 14 इतकं होतं.  या तिघांपैकी केवळ 14 वर्षांच्या मुलाला मधुमेहाचा त्रास असल्याची  माहिती आहे.

16 वर्षांच्या मुलीला कोरोना झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला अगोदरपासून मधूमेह नव्हता. मात्र, वैद्यकीय तपासणीत तिच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण प्रचंड वाढल्याचे दिसून आले. तिच्या आतड्यात रक्तस्राव होत होता. अँजिओग्राफी केल्यानंतर या मुलीला म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं.

चार आणि सहा वर्षांच्या मुलांनाही म्युकरमायकोसिसची बाधा होऊन त्यांची प्रकृती झपाट्याने खालावली होती. अखेर या मुलांचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्यांचे डोळे काढण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामुळे आता मुंबईतील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

म्युकरमायकोसिस हा अत्यंत वेगाने शरीरात पसरतो. अशातच आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी पालकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

“महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाही”

“तो दिवस लांब नाही, ज्या दिवशी शिवसेना भवनच्या काचा फुटलेल्या दिसतील”

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीनं सांगितला गेम प्लॅन, म्हणाला…

“पुणे भाजपही पंतप्रधान मोदींचा प्रॉपर्टी विकण्याचा वारसा जपतोय”

‘SEBC प्रवर्गाऐवजी EWS किंवा खुला प्रवर्ग निवडावा’; MPSC चं मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी परिपत्रक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More